Showing posts with label माहिती. Show all posts
Showing posts with label माहिती. Show all posts

28 Mar 2015

गुगलचा नवीन अभिनव कॅम्पस

गुगल कंपनी सध्या एक नवीन प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. सहजपणे इमारतीचे मजले, त्यांच्या भिंती बदलता येईल, अशा अनोख्या पद्धतीचे हलक्‍या वजनाचे बांधकाम करण्याच्या प्रयत्नात गुगल कंपनी आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला, तर बांधकाम क्षेत्रासाठी ती मोठी देणगी ठरेल. 
गुगलने अलीकडेच माउंटन व्ह्यूमध्ये एका नवीन मोठ्या कॅम्पसची निर्मिती करत असल्याचे जाहीर केले. खरंतर गुगलने ही घोषणा करणे हीच बातमीची गोष्ट असली तरीही प्रत्यक्ष कॅम्प्‌सचा आराखड्याने लोकांचे अधिक लक्ष वेधून घेतले आहे. अशा प्रकारच्या इमारती प्रत्यक्षात उभारणे शक्‍य आहे, की नाही यावरही लोक शंका घेत आहेत.

डेव्हिड रॅडक्‍लिफ गुगलमध्ये रिअल इस्टेट विभाग सांभाळतात. त्यांनी 27 फेब्रुवारीला गुगलच्या ब्लॉगवर गुगलने एका नवीन कॅम्पसची निर्मिती करण्यासाठीचा अर्ज स्थानिक "सिटी‘ला (महानगरपालिकेला) केला असल्याचे जाहीर केले. या ब्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे गुगल सॅन फ्रान्सिस्कोजवळील माउंटन व्ह्यू शहरामध्ये चार वेगवेगळ्या जागा विकसित करणार आहे. या जागांमध्ये नेहमीप्रमाणे ऑफिसला लागणाऱ्या कॉंक्रीटच्या इमारती बनवण्याऐवजी एक वेगळ्या प्रकारच्या खास हलक्‍या असलेल्या इमारती बनवल्या जाणार आहेत. गुगल सतत नवीन निर्मिती करत असते. गुगल स्वनियंत्रित कारपासून सर्च इंजिनप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींवर काम करत असते.


31 Jan 2015

महाराष्ट्र ठरला पंतप्रधान बॅनरचा उपविजेता


नॅशनल कॅडेट कोर्प्सचा (एनसीसी) सर्वोच्च बहुमान असणाऱ्या पंतप्रधान बॅनरचे उपविजेतेपद यंदा महाराष्ट्राला मिळाले आहे. बुधवारी येथील कॅन्टोनमेंट भागातील डीजी एनसीसी परेड ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंजाबला विजेतेपदाचा तर महाराष्ट्राला उपविजेतेपदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


प्रजासत्ताक दिनानिमित्त 1 जानेवारी 2015 पासून एनसीसी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील 17 एनसीसी विभागातील 2070 कॅडेट्सनी यात सहभाग घेतला होता. या शिबिरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधे अव्वल क्रमांक पटकविणाऱ्या विभागाला पंतप्रधानांच्या हस्ते `पंतप्रधान बॅनर` या बहुमानाने सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत पार पडलेल्या 23 एनसीसी शिबिरामधे महाराष्ट्राला सर्वात जास्त 17 वेळा हा बहुमान मिळाला आहे. बुधवारी महाराष्ट्राला हा बहुमान मिळाला असता तर गेल्या पाच वर्षांपासून सतत पंतप्रधान बॅनरचे विजेतेपद खिशात घालणाऱ्या महाराष्ट्राला आपले वर्चस्व कायम ठेवता आले असते.