Showing posts with label इंटर्नेट. Show all posts
Showing posts with label इंटर्नेट. Show all posts

22 May 2014

गुगल आता जगातील सर्वांत मोठा ब्रँड

अमेरिकेतील इंटरनेट सर्च इंजिन गुगलने मूल्यांकनाच्या बाबतीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिस्पर्धी ऍपल या कंपनीला मागे टाकले असून, गुगल आता जगातील सर्वांत अव्वल ब्रँड बनला आहे. 

गुगलची ब्रँड व्हॅल्यू एका वर्षामध्ये सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढली आहे. त्याचे मूल्य १५८८४ कोटी डॉलरनी (सुमारे एक लाख कोटी रुपये) वाढली आहे, असे 'मिलवर्ड ब्राऊन'च्या त्यांच्या २०१४ च्या पहिल्या शंभर ब्रँडच्या अहवालात म्हटले आहे. 

गुगल या वर्षामध्ये अत्यंत सर्जनशील बनले आहे. गुगल ग्लास, कृत्रिम गुप्तता आणि विविध भागीदाऱ्या यांमध्ये गुगलने बाजी मारली आहे. 

4 Feb 2014

क्लाऊड तंत्रज्ञान सुविधा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून शासन स्तरावरील क्लाऊड तंत्रज्ञान सुविधा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. क्लाऊडचा उपयोग करुन शासनातील विविध विभाग जलदगतीने आणि कमी खर्चात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध ॲप्लिकेशन वापरु शकतात. देशातील कुठल्याही राज्याने अथवा विभागाने क्लाऊड संदर्भात मदत मागितल्यास ते देण्यास माहिती तंत्रज्ञान विभाग सहकार्य करेल, असे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. 

माहिती तंत्रज्ञान विभागाच्यावतीने महागो क्लाऊड ॲण्ड IPS6 इनॅब्लिमेंट या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा, हॉटेल इंटर कॉन्टीनेन्टल येथे सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री.अग्रवाल बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक विरेंद्र सिंग आणि देशभरातील विविध राज्याचे तसेच राज्याच्या विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.