गाणी ऐकणे आणि ती गुणगुणत त्यात रममाण होणे हा लहान-थोरांचा आवडता छंद. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी असते. मराठी, िहदी गाणी याबरोबरच काही जणांना शास्त्रीय संगीत ऐकण्यात रस असतो. एकूण काय कर्णमधुर सुरेल संगीत सर्वानाच भावते. आपण कामात कितीही व्यस्त असलो किंवा मनावर कसलाही ताण असला तरी गाणी ऐकताना हा ताण हलकेच दूर होतो. मनाला विरंगुळा मिळतो.
पूर्वी अनेकजण आवडीच्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स, कॅसेट्स जमवायचे. नंतर त्याची जागा सीडीजनी घेतली. आता इंटरनेटवर हे सहजपणे उपलब्ध आहे सर्वानाच माहीत आहे. मराठी संगीतप्रेमींची ही आवड लक्षात घेऊन अलका विभास यांनी 'आठवणीतील गाणी' (http://www.aathavanitli-gani.com/) नावाची साइट तयार करून हे शिवधनुष्य पेलले आणि आपल्यासाठी श्रवणीय अशा ३००० मराठी गीतांचा खजिना उपलब्ध करून दिला. दिवसेंदिवस हा आकडा वाढतोच आहे.
ही साइट अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने बनवली आहे. मुख्य म्हणजे ही साइट मराठी भाषेत आहे. आवडीचे गाणे शोधण्यासाठी सहज सोपी अनुक्रमणिका येथे दिली आहे. 'नाच रे मोरा' हे सुंदर गाणे ऐकण्यासाठी अनुक्रमणिकेतील 'न'वर क्लिक करून तुम्हाला न अक्षराने सुरू होणाऱ्या गाण्यांची यादी दिसू शकते. गीतकार, संगीतकार, स्वर, चित्रपट, नाटक, संतवाणी, गीतरामायण, विविध वाहिन्यांवरील मालिका गीते अशाप्रकारे गाण्यांचे वर्गीकरण केलेले आहे.
भक्तीगीते, भावगीते, बालगीते याप्रकारे गाणी ऐकायची आहेत? अलकाताईंनी त्यासाठी गीत प्रकारानुसारही गाण्यांचे वर्गीकरण करून दिले आहे. तुम्हाला एखाद्या विशिष्ट रागप्रकाराची गाणी ऐकायची असतील तर त्यासाठी त्यांनी रागसरिता हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आवडीच्या रागावर क्लिक करून तुम्ही ती गाणी ऐकू शकता.