ब्लॉग बद्दल

सामुहिक माहिती देवाणघेवाणीच्या तत्वावर आधारित - 

      e- माहिती हा ब्लॉग सुरु करण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे कि आपणास विविध क्षेत्रातील विविध माहिती विविध तज्ञाकडून एकाच ठिकाणी मिळावी.
       इंटरनेटवर असंख्य अश्या वेब साईट आहे कि ज्यावर आपणास हवी असणारी माहिती एका क्लिक वर मिळेल, मग ह्या ब्लॉगचा खटाटोप कश्याला? तर तो एवध्यासाठीच कि हि सर्व माहिती आपल्याला मराठीत आणी जास्त फापटपसारा न करता योग्य मुद्यासाहित उपलब्ध करून देणे.
      हातातल्या प्रत्येक बोटातली ताकत हि नगण्यच असते जेव्हा ती बोटे एकत्र नसतात, परंतु जेव्हा याच बोटांची मिळून 'मुठ्ठी' बनते तेव्हा त्यातील ताकतीची कल्पना आपल्या सर्वांनाच आहे. हाच प्रयत्न आम्ही माहितीच्या बाबतीत इथे करत अहो.
      पुष्कळ जणांकडे बरचसं ज्ञान असते पण बरेच लोकांकडे पुष्कळसं ज्ञान नसते. त्यामुळे एकाच ठिकाणी बरचसं नही तर पुष्कळसं ज्ञान मिळविण्याच्या उद्देशाने या सामुहिक माहिती देवाणघेवाणीचा कट्टा स्थापन करण्यात आला आहे.
      आपण आपल्याला असलेली माहिती इथे शेयर करायची आणी इतरांनी शेयर केलेली माहिती मिळवून आपल्या ज्ञानात भर घालायची.

    शेवटी माहितीचा सागर हा अखंड असतो आणी मनुष्याची शिकण्याची क्रिया काही संपत नसते.


No comments:

Post a Comment