28 Mar 2015

गुगलचा नवीन अभिनव कॅम्पस

गुगल कंपनी सध्या एक नवीन प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. सहजपणे इमारतीचे मजले, त्यांच्या भिंती बदलता येईल, अशा अनोख्या पद्धतीचे हलक्‍या वजनाचे बांधकाम करण्याच्या प्रयत्नात गुगल कंपनी आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला, तर बांधकाम क्षेत्रासाठी ती मोठी देणगी ठरेल. 
गुगलने अलीकडेच माउंटन व्ह्यूमध्ये एका नवीन मोठ्या कॅम्पसची निर्मिती करत असल्याचे जाहीर केले. खरंतर गुगलने ही घोषणा करणे हीच बातमीची गोष्ट असली तरीही प्रत्यक्ष कॅम्प्‌सचा आराखड्याने लोकांचे अधिक लक्ष वेधून घेतले आहे. अशा प्रकारच्या इमारती प्रत्यक्षात उभारणे शक्‍य आहे, की नाही यावरही लोक शंका घेत आहेत.

डेव्हिड रॅडक्‍लिफ गुगलमध्ये रिअल इस्टेट विभाग सांभाळतात. त्यांनी 27 फेब्रुवारीला गुगलच्या ब्लॉगवर गुगलने एका नवीन कॅम्पसची निर्मिती करण्यासाठीचा अर्ज स्थानिक "सिटी‘ला (महानगरपालिकेला) केला असल्याचे जाहीर केले. या ब्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे गुगल सॅन फ्रान्सिस्कोजवळील माउंटन व्ह्यू शहरामध्ये चार वेगवेगळ्या जागा विकसित करणार आहे. या जागांमध्ये नेहमीप्रमाणे ऑफिसला लागणाऱ्या कॉंक्रीटच्या इमारती बनवण्याऐवजी एक वेगळ्या प्रकारच्या खास हलक्‍या असलेल्या इमारती बनवल्या जाणार आहेत. गुगल सतत नवीन निर्मिती करत असते. गुगल स्वनियंत्रित कारपासून सर्च इंजिनप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींवर काम करत असते.


27 Mar 2015

मैफिल मराठी गाण्यांची

गाणी ऐकणे आणि ती गुणगुणत त्यात रममाण होणे हा लहान-थोरांचा आवडता छंद. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी असते. मराठी, िहदी गाणी याबरोबरच काही जणांना शास्त्रीय संगीत ऐकण्यात रस असतो. एकूण काय कर्णमधुर सुरेल संगीत सर्वानाच भावते. आपण कामात कितीही व्यस्त असलो किंवा मनावर कसलाही ताण असला तरी गाणी ऐकताना हा ताण हलकेच दूर होतो. मनाला विरंगुळा मिळतो.

पूर्वी अनेकजण आवडीच्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स, कॅसेट्स जमवायचे. नंतर त्याची जागा सीडीजनी घेतली. आता इंटरनेटवर हे  सहजपणे उपलब्ध आहे सर्वानाच माहीत आहे. मराठी संगीतप्रेमींची ही आवड लक्षात घेऊन अलका विभास यांनी 'आठवणीतील गाणी'  (http://www.aathavanitli-gani.com/) नावाची साइट तयार करून हे शिवधनुष्य पेलले आणि आपल्यासाठी श्रवणीय अशा ३००० मराठी गीतांचा खजिना उपलब्ध करून दिला. दिवसेंदिवस हा आकडा वाढतोच आहे. 

ही साइट अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने बनवली आहे. मुख्य म्हणजे ही साइट मराठी भाषेत आहे. आवडीचे गाणे शोधण्यासाठी सहज सोपी अनुक्रमणिका येथे दिली आहे. 'नाच रे मोरा' हे सुंदर गाणे ऐकण्यासाठी अनुक्रमणिकेतील 'न'वर क्लिक करून तुम्हाला न अक्षराने सुरू होणाऱ्या गाण्यांची यादी दिसू शकते. गीतकार, संगीतकार, स्वर, चित्रपट, नाटक, संतवाणी, गीतरामायण, विविध वाहिन्यांवरील मालिका गीते अशाप्रकारे गाण्यांचे वर्गीकरण केलेले आहे.

भक्तीगीते, भावगीते, बालगीते याप्रकारे गाणी ऐकायची आहेत? अलकाताईंनी त्यासाठी गीत प्रकारानुसारही गाण्यांचे वर्गीकरण करून दिले आहे. तुम्हाला एखाद्या विशिष्ट  रागप्रकाराची गाणी ऐकायची असतील तर त्यासाठी त्यांनी रागसरिता हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आवडीच्या रागावर क्लिक करून तुम्ही ती गाणी ऐकू शकता.

31 Jan 2015

महाराष्ट्र ठरला पंतप्रधान बॅनरचा उपविजेता


नॅशनल कॅडेट कोर्प्सचा (एनसीसी) सर्वोच्च बहुमान असणाऱ्या पंतप्रधान बॅनरचे उपविजेतेपद यंदा महाराष्ट्राला मिळाले आहे. बुधवारी येथील कॅन्टोनमेंट भागातील डीजी एनसीसी परेड ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंजाबला विजेतेपदाचा तर महाराष्ट्राला उपविजेतेपदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


प्रजासत्ताक दिनानिमित्त 1 जानेवारी 2015 पासून एनसीसी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील 17 एनसीसी विभागातील 2070 कॅडेट्सनी यात सहभाग घेतला होता. या शिबिरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधे अव्वल क्रमांक पटकविणाऱ्या विभागाला पंतप्रधानांच्या हस्ते `पंतप्रधान बॅनर` या बहुमानाने सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत पार पडलेल्या 23 एनसीसी शिबिरामधे महाराष्ट्राला सर्वात जास्त 17 वेळा हा बहुमान मिळाला आहे. बुधवारी महाराष्ट्राला हा बहुमान मिळाला असता तर गेल्या पाच वर्षांपासून सतत पंतप्रधान बॅनरचे विजेतेपद खिशात घालणाऱ्या महाराष्ट्राला आपले वर्चस्व कायम ठेवता आले असते.


22 May 2014

गुगल आता जगातील सर्वांत मोठा ब्रँड

अमेरिकेतील इंटरनेट सर्च इंजिन गुगलने मूल्यांकनाच्या बाबतीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिस्पर्धी ऍपल या कंपनीला मागे टाकले असून, गुगल आता जगातील सर्वांत अव्वल ब्रँड बनला आहे. 

गुगलची ब्रँड व्हॅल्यू एका वर्षामध्ये सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढली आहे. त्याचे मूल्य १५८८४ कोटी डॉलरनी (सुमारे एक लाख कोटी रुपये) वाढली आहे, असे 'मिलवर्ड ब्राऊन'च्या त्यांच्या २०१४ च्या पहिल्या शंभर ब्रँडच्या अहवालात म्हटले आहे. 

गुगल या वर्षामध्ये अत्यंत सर्जनशील बनले आहे. गुगल ग्लास, कृत्रिम गुप्तता आणि विविध भागीदाऱ्या यांमध्ये गुगलने बाजी मारली आहे. 

14 Mar 2014

'ई-ऑफीस' मुळे महाराष्ट्रातील ऑफिस होणार 'पेपरलेस ऑफिस'.


'पेपरलेस ऑफीस' ही संकल्पना संभ्रमित करणारी होती. परंतू राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या 'ई-ऑफीस' या संगणक प्रणालीमुळे कार्यालयास पेपरमुक्त होण्याची ग्वाही मिळाली आहे.


सरकारी कामकाजात कागद आणि संचिका (फाईलचे) अनन्यसाधारण महत्व आहे. परंपरागत पद्धतीने सरकारी यंत्रणेत सर्व माहिती लेखी स्वरूपात जतन केली जाते. प्रशासनात विविध ई-गव्हर्नन्स प्रकल्पांची अंमलबजावणी होऊनसुद्धा लेखी स्वरूपातील माहितीचे तेवढेच महत्व आहे.