5 Mar 2014

आकाश (टॅबलेट)

आकाश हा ॲन्ड्रॉइड  प्रणालीवर चालणारा एक टॅबलेट संगणक आहे. डेटाविंड ह्या माँत्रियाल-स्थित कंपनीने ह्याचे डिझाईन तयार केले असून त्याचे उप्तादन भारतात केले जाईल. ह्या टॅबलेटचा वापर व्हिडियो पाहण्यासाठी, संगीत ऐकण्यासाठी, पुस्तके व मासिके वाचण्यासाठी तसेच इंटरनेट ब्राउझिंगसाठी करता येईल. अंदाजे ६० अमेरिकन डॉलर किंमत असलेला व यूबीस्लेट ७ ह्या नावाने विकला जाणारा आकाश हा सर्व आधुनिक सुविधा असणारा जगातील सर्वांत स्वस्त टॅबलेट असेल. ह्या टॅबलेटचा उपयोग भारतभरातील २५,०००कॉलेजे व ४०० विद्यापीठे इ-शिक्षणासाठी करतील असा अंदाज केला गेला आहे. भारत सरकारने अंदाजे १ लाख आकाश टॅबलेट उपकरणे खरेदी केल्याचे वृत्त आहे.


हार्डवेअर

  • ७ इंच टचस्क्रिन
  • दणकट बांधणी
  • वायरलेस इंटरनेट
  • हेडफोन जॅक
  • २ युएसबी पोर्टस
  • एआरएम आर्किटेक्चर प्रोसेसर
  • २५६ एमबी मेमरी

सॉफ्टवेअर

  • ॲन्ड्रॉइड २.२
  • आयआयटीने विकसित केलेली शैक्षणिक सॉफ्टवेअर

शब्देतिहास

ह्या टॅबलेट ला आकश हे नाव देन्या पुर्वी साक्शात हे नाव दिले गेले होते.आकश हे नाव संस्कृत शब्द ' आकाशा ' ह्या वरुन घेतले गेले असुन ह्या शब्दाचे पुष्कळ अर्थ आहेत जसे की नभ,गगन.

विनिर्देश


विनिर्देशआकाशयूबीस्लेट 7+
किंमतभारतीय रूपया२,५००भारतीय रूपया२,९९९
मध्यवर्ती प्रक्रियन विभाग गतीARM11, 366 MHzARM कोर्टेक्स-A8, 700 MHz
रॅम२५६ एमबी२५६ एमबी[१]
बाट्री2100 mAh3200 mAh
ओपेरेटींग सिस्टीमॲन्ड्रॉइड 2.2 फ्रोयोॲन्ड्रॉइड 2.3 जिंजर्ब्रेड
नेटवर्कWi-FiWi-Fi, GPRS फोन नेटवर्क
निर्माणाचे ठिकाणभारतभारत
Source- Wikipedia.

No comments:

Post a Comment